आयुष्यातला कर्णधार..❤️🌍 #16june2024

आयुष्याच्या रंगमंचावर कित्येक कलाकार होऊन गेले पण एकदम निस्वार्थ पणे भुमिका निभवनारा मात्र तु एकमेव.
               
          मी अजुन एवढी सक्षम नाही की तुझ ऋण फेडु शकेल. एवढी परिपक्व ही नाही की तुला समजुन घेऊ शकेल, आणि एवढी मोठ्ठी ही नाही की तुझ्याबद्दल काहीतरी लिहु शकेल. पण; एक नक्कीच की, मी जगाच्या पाठीवर कुठेजरी गेले तरी; तु दिलेल्या संस्काराची शिदोरी मात्र कायम जपुन ठेवीन.
                ज्या झाडांची मुळं खोलवर जमिनीवर रुजलेली असतात, त्या झाडांना भीती नाही वाटत वादळाची, मग ते वादळ कितीही मोठ्ठं असो..अगदी तसच माझी बीज तुझ्याशी रुजलेली आहेत म्हणुन कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी भीती नाही वाटत. अडचणी ही यायला घाबरतात कारण त्यांना माहित आहे माझ्यामागे तुझा पाठिंबा किती मोठ्ठा आहे ते.
                     एखाद्या कळीच रूपांतर फुलात होत असताना, किव्वा एका रोपट्याच रूपांतर झाडात होत असताना त्याला जस खतपाणी घालावं लागत तसच अगदी तुझ्या आशीर्वादाचा, संस्कारच आणि विचारांच खतपाणी तु दिलंय, त्याला जस तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं अगदी तसच तु मला जपलय. तुझ्या प्रेरक विचाराने आणि संयमाने मी नेहमीच प्रभावित आहे. 
                    माझ्यामधल्या अल्लड पणाला तु ज्या पद्धतीने समजुन घेतोस, किव्वा माझ्यामधले mood swings जसे handle करतोस तस कुणीच नाही करू शकत. खुप साऱ्या गोष्टींतुन तु मला अगदी सहजरीत्या सावरलय. प्रत्येक वेळी तु मला माझ्यापेक्षा जास्त समजुन घेतलय. वेळप्रसंगी एखादी गोष्ट तितक्याच तीव्रतेने उमजुन ही सांगितलीय. खरच ! तुझ्यासारखा कलाकार तुच रे ..
                  हवामान बदलत ऋतूनुसार, माणसं बदलतात परस्थितीनुसार .. पण तु माझ्या आयुष्यातला मात्र constant. जगाला प्रकाशमय करणारा सुर्य आहे, पण; माझ्या आयुष्यात प्रकाश आणणारा मात्र तु आहेस. तुझ्या ह्या उदार व्यक्तिमत्वाच मला खुप नवल आहे.

                  ना कधी लागु दिल्या
                  तु मला दुःखाच्या झळा..

                 ना कधी जाणवु दिला
                 मला उन्हाळा पावसाळा..

                तु फक्त अखंड देत राहिलास
                साथ आणि जिव्हाळा..!


              खरतर तुझी व्यापकता ह्या शब्दापलीकडची..

Comments