आयुष्यातला कर्णधार..❤️🌍 #16june2024
आयुष्याच्या रंगमंचावर कित्येक कलाकार होऊन गेले पण एकदम निस्वार्थ पणे भुमिका निभवनारा मात्र तु एकमेव. मी अजुन एवढी सक्षम नाही की तुझ ऋण फेडु शकेल. एवढी परिपक्व ही नाही की तुला समजुन घेऊ शकेल, आणि एवढी मोठ्ठी ही नाही की तुझ्याबद्दल काहीतरी लिहु शकेल. पण; एक नक्कीच की, मी जगाच्या पाठीवर कुठेजरी गेले तरी; तु दिलेल्या संस्काराची शिदोरी मात्र कायम जपुन ठेवीन. ज्या झाडांची मुळं खोलवर जमिनीवर रुजलेली असतात, त्या झाडांना भीती नाही वाटत वादळाची, मग ते वादळ कितीही मोठ्ठं असो..अगदी तसच माझी बीज तुझ्याशी रुजलेली आहेत म्हणुन कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी भीती नाही वाटत. अडचणी ही यायला घाबरतात कारण त्यांना माहित आहे माझ्यामागे तुझा पाठिंबा किती मोठ्ठा आहे ते. एखाद्या कळीच रूपांतर फुलात होत असताना, किव्वा एका रोपट्याच रूपांतर झाडात होत असताना त्याला जस खतपाणी घालावं लागत तसच अगदी तुझ्या आशीर्वादाचा, संस्कारच आणि विचारांच खतपाणी तु दिलंय, त्याला जस तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं अगदी तसच तु मला जपलय. तुझ्या प्रेरक विचाराने आणि संयमाने मी