आधारस्तंभ (वडील) !!

मी अजुन एवढी सक्षम नाही की तुझ ऋण फेडु शकेल. एवढी परिपक्व ही नाही की तुला समजुन घेऊ शकेल, आणि एवढी मोठ्ठी ही नाही की तुझ्याबद्दल काहीतरी लिहु शकेल. पण; एक नक्कीच की, मी जगाच्या पाठीवर कुठेजरी गेले तरी; तु दिलेल्या संस्काराची शिदोरी मात्र कायम जपुन ठेवीन.
                ज्या झाडांची मुळं खोलवर जमिनीवर रुजलेली असतात, त्या झाडांना भीती नाही वाटत वादळाची,  मग ते वादळ कितीही मोठ्ठं असो..अगदी तसच माझी बीज तुझ्याशी रुजलेली आहेत म्हणुन कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी भीती नाही वाटत. अडचणी ही यायला घाबरतात कारण त्यांना माहित आहे माझ्यामागे तुझा पाठिंबा किती मोठ्ठा आहे ते.
                     एखाद्या कळीच रूपांतर फुलात होत असताना, किव्वा एका रोपट्याच रूपांतर झाडात होत असताना त्याला जस तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं अगदी तसच तु मला जपलय. तुला माहितीय जस जस मला बाहेरच जग कळू लागलं तस तस् मला जाणवलं की तु किती अडचणींतून मला वाढवलय आणि लोकांच्या कीती वाईट नजरेतून मला सुरक्षित ठेवलय.
                   मी नेहमी बघत आलीय रे तुझ्या मनात माझ्याबद्दलची काळजी आणि तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल च अपार प्रेम, ज्याला कुठेच ह्या जगात तोड नाही. तु माझ्यासोबत आहेस म्हणुन खुप खडतर गोष्टी सुद्धा अगदी सहज पणे पार पडतात. कारण; तु शिकवलंय मला परस्थिती कशीही असो भक्कमपने उभ रहायला .
                   तुला माहितीय का, माझ्या मध्ये खुप दोष आहेत .पण; कळत नकळत जरी एखादा गुण असेल तर तो तुझ्यामुळेच. अंधारात तर माझी सावलीही माझी साथ सोडते पण तु अडचणीच्या वेळी अजुन जास्त घट्ट हात पकडुन उभा राहतो. तुझी साथ सुटण्याची कधीच भीती नाही वाटत रे कारण तु कधीच हात सोडणार नाही हे माहितीय मला.
                    माझ्यामधल्या अल्लड पणाला तु ज्या पद्धतीने समजुन घेतोस, किव्वा माझ्यामधले mood swings जसे handle करतोस तस कुणीच नाही रे करू शकत. खुप साऱ्या गोष्टींतुन तु मला अगदी सहजरीत्या सावरलय. प्रत्येक वेळी तु मला माझ्यापेक्षा जास्त समजुन घेतलय. वेळप्रसंगी एखादी गोष्ट तितक्याच तीव्रतेने उमजुन ही सांगितलीय. खरच ! तुझ्यासारखा कलाकार तुच रे ..
                  हवामान बदलत ऋतूनुसार, माणसं बदलतात परस्थितीनुसार .. पण तु माझ्या आयुष्यात मात्र constant राहिलास रे. जगाला प्रकाशमय करणारा सुर्य आहे, पण; माझ्या आयुष्यात प्रकाश आणणारा मात्र तु आहेस. तुझ्या ह्या उदार व्यक्तिमत्वाच मला खुप नवल आहे.

           ना कधी लागु दिल्या
                  तु मला दुःखाच्या झळा..

                 ना कधी जाणवु दिला
                 मला उन्हाळा पावसाळा..

                तु फक्त अखंड देत राहिलास
                साथ आणि जिव्हाळा..!


              खरतर तुझी व्यापकता ह्या शब्दापलीकडची..

Comments

Popular posts from this blog

आयुष्यातला कर्णधार..❤️🌍 #16june2024