जागतिक महिला दिन !! ' ती'!!

कधी 'ती' वाघिणीचा अवतार
कधी 'ती' तलवार धारदार

कधी 'ती' चंद्रकोरीची रेख
कधी 'ती' जिजाऊंची लेक

कधी 'ती' धाडसी उत्तेजना
कधी 'ती' एक शिवगर्जना

कधी 'ती' एक नाजुक नारी
कधी 'ती' एक उत्तुंग भरारी

कधी 'ती' आरंभ; 
कधी 'ती' अंत
कधी 'ती' मर्यादेशील;
कधी 'ती' अनंत...

Comments

Popular posts from this blog

आयुष्यातला कर्णधार..❤️🌍 #16june2024